देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन
- September 23, 2025
- 40 Views
चिपळूण: जीवन वाचवण्याचे अत्यावश्यक कौशल्य म्हणून हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (CPR) प्रशिक्षण नगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांनी या प्रशिक्षणात 150 अधिकाऱ्यांना CPR चे प्रत्यक्ष कौशल्य शिकवले.
याशिवाय लहान बाळांमध्ये CPR कसे करावे हे प्रशिक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश जोशी यांनी दिले. या उपक्रमात चिपळूण नगरपालिका CO श्री विशाल भोसले, पोलीस इन्स्पेक्टर फुलचंद मेंगाडे, अपारंत हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. यतीन जाधव, तसेच कामथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. असित नरवाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर प्रशिक्षण कामथे रुग्णालय आणि अपारंत हॉस्पिटल यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले असून, हे CPR अवेअरनेस सप्ताह 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान शासन मान्य कार्यक्रमाचा भाग आहे. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये एक जीवनरक्षक कौशल्याची जागरूकता वाढवणे आहे. प्रशिक्षित झालेल्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकार किंवा श्वसनबाधा झालेल्या रुग्णाला वैद्यकीय मदत मिळण्यापर्यंत CPR करून जीवनदान देणे शक्य होते.
सदर उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि अधिकारी कर्मचारी यांनी सर्वत्र कौतुक केले असून, कार्यक्रमाची सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली आहे. प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत जीवन वाचवण्याचे सामर्थ्य स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण होईल, असे कार्यक्रम संयोजकांनी सांगितले.
