स्मार्टअस ॲबॅकस क्लासेसचे राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णयश
- by Yogesh Bandagale
- January 08, 2026
- 518 views
चिपळूण : दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यातील कर्वेनगर येथे झालेल्या स्मार्टअस नॅशनल लेव्हल ॲबॅकस स्पर्धेत स्मार्टअस ॲबॅकस क्लासेस, सती (चिपळूण) या शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ९ पारितोषिके पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवला असून, या यशामुळे संपूर्ण कोकणाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
देशभरातून हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने भरलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चिपळूण शाखेतील २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अचूकता, वेग, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. या स्पर्धेचे नियोजन व यशस्वी आयोजन स्मार्टअस एज्युकेशन प्रा. लि.चे संचालक मा. डॉ. नरेंद्र शेलार सर व मा. सौ. स्मिता शेलार यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली पार पडले असून या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी शाखेच्या शिक्षिका सौ. आराध्या सुरेश भोसले, सर्व विद्यार्थी व पालकवर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या यशाची दखल घेत चिपळूणमधील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून आमदार शेखर निकम, अनिरुद्ध निकम व सौ. पुजाताई निकम यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा विशेष सन्मान करून गौरव केला. या स्पर्धेत ज्युनिअर लेव्हलमध्ये तेजस तुषार गगनग्रास याने द्वितीय तर विराज विनय पवार याने तृतीय क्रमांक पटकावला, लेव्हल Aमध्ये रुद्र कृष्णा ढेरे याने प्रथम, तिर्था सुदर्शन देसाई याने तृतीय व राघव श्रीमंतराय जमादार याने पाचवा क्रमांक मिळवला, लेव्हल Bमध्ये मोक्ष प्रविण चव्हाण याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर लेव्हल D मध्ये वरदराज संतोष पांढरे याने प्रथम, विनोद अशोक राठोड याने चौथा व आर्यन संतोष कलकुटकी याने पाचवा क्रमांक मिळवला.
तसेच सौम्या अमित जोशी, आर्य रुपेश काजवे, गिरीश अरविंद मोरे, पृथा प्रिन्स सावंत, आरोही निलेश ठाकरे, मैथिली वैभव राणे, सफवान इरशद खलपे, रुद्र राहुल गुजले, रुद्र प्रफुल्ल कानडे, मल्हार उमेश पवार व भार्गवी रंजित आवले या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संस्थेची मान उंचावली. हे यश म्हणजे केवळ बक्षिसांचे नव्हे तर शिस्त, सातत्य, परिश्रम व योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक असून स्मार्टअस ॲबॅकस क्लासेस, सती (चिपळूण) यांचा हा विजय भविष्यातील अनेक यशकथांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
