सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये राज्य क्रीडा दिन

चिपळूण : प. ए. सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी राज्य क्रीडा दिन तसेच भारताचे थोर ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे व माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सविता कर्वे यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमात इयत्ता नववी ‘अ’ ची विद्यार्थिनी कु. सई शिंदे हिने खाशाबा जाधव यांची थोडक्यात माहिती सादर केली. त्यानंतर इयत्ता आठवी ‘अ’ ची विद्यार्थिनी कु. सान्वी खोत हिने त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्ट, शिस्त व सातत्य या यशाच्या त्रिसूत्रीचे महत्त्व विशद केले. तसेच सहाय्यक शिक्षक श्री. तुषार जाधव यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून खाशाबा जाधव यांचा संपूर्ण जीवनपट प्रभावीपणे सादर केला.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेच्या माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका व कार्यक्रम विभाग प्रमुख सौ. स्नेहा भागवत, क्रीडाशिक्षक श्री. माणिक पाटील, सौ. संगीता जोशी तसेच श्री. तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. तुषार जाधव यांनी केले. कार्यक्रमाला प्रशालेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.

संबंधित लेख