श्रीराम एज्युकेशन सोसायटीतर्फे श्रीराम क्रीडा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण यांच्या वतीने आयोजित श्रीराम क्रीडा महोत्सव (२०२६–२७) चे उद्घाटन श्री. आनंदराव पवार महाविद्यालयात उत्साहात पार पडले. दि. १४, १५ व १६ जानेवारी असे तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे आणि सांघिक भावना विकसित करणे हा आहे.

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महादेव उर्फ बाळा कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ घेण्यात आली. या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी यांसह विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रांत निवाते यांनी केले.

या प्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर सर, कार्याध्यक्ष श्री. राजन खेडेकर, कार्यवाह श्री. मल्लेश लकेश्री, कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड, बांधकाम विभाग प्रमुख सुहास चव्हाण, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे प्राचार्य भाऊ कांबळे, महादेव उर्फ बाळा कदम, पी.आर.ओ. चोगले, रजिस्टार अजित खेडेकर, प्राचार्य अरुणा सोमण, तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख