वैभव जोशींच्या कवितांसह अभिषेक नलावडे आणि शमिका भिडे यांच्या सुरेल मैफलीची रसिकांना प्रतीक्षा
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 347 views
चिपळूण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पाडव्याच्या शुभप्रसंगी चिपळूणकर रसिकांसाठी संगीत, काव्य आणि सादरीकरणाचा एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे. ‘सुपरनोव्हा एंटरटेनमेंट’ तर्फे, पी. एन. जी. सराफ आणि जवेरी यांच्या प्रस्तुतीत ‘शब्दांच्या पलीकडले’ हा अप्रतिम संगीत सोहळा बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमात प्रथमच चिपळूणच्या रसिकांसमोर सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी (मन तुझं जलतरंग फेम) आपल्या कवितांचा खास नजराणा सादर करणार आहेत. यातील विशेष आकर्षण म्हणजे वैभव जोशी यांनी लिहिलेली दोन नवी गाणी, ज्यांना मैत्रेय जोशी आणि प्रणव हरिदास यांनी संगीतबद्ध केले आहे. ही गाणी प्रथमच या मंचावर सादर होणार आहेत.
सोबतच सुगम व भक्ती संगीताची रंगतदार मैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. चिपळूणचा सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गायक अभिषेक नलावडे तसेच कोकणची लाडकी गायिका शमिका भिडे यांच्या सुमधुर गायनाने दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निवेदिका दीप्ती भागवत आपल्या ओघवत्या वाणीतून करणार आहेत. संगीत संयोजनाची जबाबदारी सुप्रसिद्ध संगीतकार प्रणव हरिदास यांनी सांभाळली असून, त्यांना साथ देणार आहेत प्रतिभावान वादक सौरभ शिर्के, हर्ष परमार, अमोघ दांडेकर आणि झंकार कानडे.
या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत बरवा स्किन थेरपी.
तिकीट विक्री १९ ऑक्टोबर २०२५ पासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सुरू होणार असून, तिकीटांचे ऑनलाइन बुकिंग Ticketalay वर देखील उपलब्ध आहे.
? तिकीटांसाठी संपर्क : योगेश कुश्टे – ९४२३२ ९३९५१
फोन बुकिंगला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आयोजकांनी आवाहन केले आहे की —
“शब्द आणि स्वरांच्या सुरेल संगमातून भावविश्वाचा नवा अनुभव घेण्यासाठी आपल्या परिवारासह उपस्थित राहा आणि दिवाळीचा आनंद अधिक सुंदर बनवा.”
