विठ्ठलवाडी गणेशोत्सव मंडळातर्फे विजयी नगरसेवकांचा सत्कार

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक ८ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री. योगेश जगन्नाथ पवार व सौ. शैनाज नजिर वांगडे यांनी जवळपास ३०० ते ३५० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगरसेवकपद पटकावले.

या विजयाच्या निमित्ताने खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विजयी उमेदवार श्री. योगेश पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सौ. दिशाताई दाभोळकर, श्री. दशरथ शेठ दाभोळकर, श्री. विकास ढवण सर, श्री. रियाज खेरटकर, श्री. राकेश दाभोळकर, श्री. प्रशांत दाभोळकर, श्री. भीमराव पवार, श्री. भीमराव व्यंकू पवार, श्री. दत्तात्रय (बाळू) कदम, श्री. अभिजीत यादव, श्री. आनंद वाडकर, श्री. तन्वीर खेरटकर, श्री. विकास पवार, श्री. सम्राट भोसले, श्री. सोहम दाभोळकर, श्री. संभाजी वाडकर, श्री. पांडुरंग वाडकर, श्री. जयेश वाडकर, श्री. अमेध दाभोळकर आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख