वाशिष्टी कृषी प्रदर्शनात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 27 views
प्रशांत यादव यांच्या हस्ते पत्रकार गौरव सोहळा संपन्न
चिपळूण : वाशिष्टी कृषी व पशुधन प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. समाजातील प्रश्न, घडामोडी व वास्तव निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा गौरव म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रशांत यादव म्हणाले की, पत्रकारांनी एकत्र येऊन स्वतःसाठीही काहीतरी उभे केले पाहिजे. अशा उपक्रमांना आमच्यासारख्या लोकांचे निश्चित सहकार्य राहील. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, समीर जाधव व निसार शेख यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास सुभाष कदम, राजेश कांबळे, संदीप बांद्रे, राजेंद्र शिंदे, राजेश जाधव, नागेश पाटील, सुशांत कांबळे, शैलेश जाधव, स्वाती हटकर, इकलाक खान, गुलजार गोलंदाज, बाळू कोकाटे, शकील तांबे, मिलिंद सकपाळ, दीपक शिंदे, संजय सुर्वे, सुरेश पवार, अनिल फाळके, ओंकार रेळेकर, हेमंत चव्हाण यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या माध्यमातून समाजातील बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.
