न्यू इंग्लिश स्कूल भेलसईचे विज्ञान रंजन परीक्षेत घवघवीत यश
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 194 views
खेड : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल भेलसई, ता. खेड या विद्यालयाने रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळातर्फे आयोजित विज्ञान रंजन परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या परीक्षेतील गट क्रमांक दोन मध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी आर्या राजाराम धाडवे हिने खेड तालुक्यातून पाचवा क्रमांक पटकावत उत्तम कामगिरी केली आहे. तिची जिल्हास्तरावर निवड झाली असून, या यशामुळे तिने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
कुमारी आर्या धाडवे हिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. वावरे सर, सर्व शिक्षकवृंद, शालेय समिती सदस्य, पालकवर्ग तसेच सहकारी विद्यार्थ्यांकडून तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
या यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल भेलसईच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, भविष्यातही असेच यश विद्यार्थ्यांकडून मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
