नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 252 views
चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवासस्थानी तसेच माऊली संपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नगरपालिकेचे निवृत्त अधिकारी श्री. खापरे व श्री. हळदे, नगरसेविका उमा देसाई, शिवसेनेचे भैय्या कदम, नगरसेवक संजय गोताड, उदय देसाई यांच्यासह क्रीडाई चिपळूणचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व मंडळांचे प्रतिनिधी नगराध्यक्षांना भेट देत शुभेच्छा व्यक्त करीत आहेत.
शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची अपेक्षा व्यक्त करत अनेकांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना पुढील वाटचालीसाठी यशस्वी नेतृत्वाच्या शुभेच्छा दिल्या.
