देवरुख बाजारपेठेत भटक्या श्वानांचे चावा घेण्याची वाढती घटना
- by Yogesh Bandagale
- January 29, 2026
- 65 views
देवरुख : देवरुख मधील भर बाजारपेठेत भटक्या श्वानांचे नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, प्रशासनाकडे अद्याप याकडे गंभीर लक्ष नाही, तर नवविरोधी लोकप्रतिनिधी देखील या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
नगरपंचायतीकडे संपर्क साधला असता, भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांचे नियंत्रण करण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. यासाठी संदर्भातील टेंडर प्रक्रियेचे काम चालू असून, त्यानुसार पुढील पावले उचलली जाणार आहेत, असे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
भर बाजारपेठेत आत्तापर्यंत सुमारे चार ते पाच अशा घटना घडल्याचे दिसून आले असून, येथून रोज रहदारी करणाऱ्या नागरिक, शाळा-कॉलेजमधील मुले, व्यापारी आणि नोकरदार वर्ग यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे असल्याचे मागणी वैभव बापू संसारे यांनी प्रशासनाकडे या बातमीच्या माध्यमातून केली आहे.
