देवरुखमध्ये ‘ओमेगा गार्डन हॉल’चे उद्घाटन ४ मे रोजी
- by Yogesh Bandagale
- May 02, 2026
- 102 views
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘ओमेगा गार्डन हॉल’ या वास्तूचे उद्घाटन सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या उद्घाटन समारंभाला गुहागर मतदारसंघाचे आमदार मा. भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार मा. शेखरजी निकम हे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. तसेच नगराध्यक्ष मा. सौ. मृणालताई शेटये, नगरसेवक मा. अजयशेठ भालेरकर, माजी आमदार मा. रवींद्रजी माने आणि मा. सुभाषजी बने यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
देवरुख येथील स्व. सावरकर चौक परिसरात उभारण्यात आलेला हा हॉल विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कापडी परिवारातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री. कळपेश किशोर कापडी व सौ. अनघा कळपेश कापडी यांनी केले असून, संयोजन श्री. संतोष (बंड्या) एकनाथ जाधव हे करीत आहेत.
