डॉ. सागर शिर्के यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त
- by Yogesh Bandagale
- January 09, 2026
- 340 views
विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव
चिपळूण : शहरातील माळक (मालक) येथील डॉ. सागर शिर्के यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल शहरातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. सागर शिर्के यांचे अभिनंदन करताना डॉ. गोविंद जोशी, प्रसन्ना बापट, निशा सकपाळ, अर्जुन साळवी, पवन राठोड यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच एचडीएफसी बँकेच्या वतीने सागर जागुष्टे, आदित्य गांधी, संकेत शिंदे, सुशील सोनकांबळे, जितेंद्र बामणे, संदीप कदम, शशांक दामले व विकास कदम यांनीही डॉ. शिर्के यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.
डॉ. सागर शिर्के यांच्या या यशामुळे चिपळूण शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
