डी. बी. जे. महाविद्यालयात ‘Eco’s Echo 2025-26’ राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 30 views
चिपळूण : नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘Eco’s Echo 2025-26’ या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य सी. सी. आठवले, रजिस्ट्रार व्ही. आर. जाधव, विभागप्रमुख प्रा. एस. के. नामदास, डॉ. यू. डी. सूर्यवंशी, प्रा. ए. व्ही. जोशी तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
? विविध अर्थविषयक संकल्पनांवर पोस्टर सादरीकरण
आरबीआयचे गव्हर्नर, पंचवार्षिक योजना, वित्त आयोग, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते, भारतीय चलनाची उत्क्रांती, विविध नोटांचा इतिहास, रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके तसेच विविध अर्थशास्त्रज्ञांची माहिती अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी माहिती संकलित करून आकर्षक पोस्टर्स सादर केली.
नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉ. दीपक विखारे यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
? राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेत विजेत्यांचा गौरव
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले.
? प्रथम क्रमांक – गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (फिरता चषक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक)
? द्वितीय क्रमांक – आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख
? तृतीय क्रमांक – डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अविनाश जोशी, प्राचार्य डॉ. एम. एस. बापट व विभागप्रमुख प्रा. एस. के. नामदास यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. के. आर. चव्हाण सरतापे, प्रा. डॉ. दिनेश पारखे व प्रा. सौ. प्रिया खवले यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. यू. डी. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. व्ही. जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. के. नामदास यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
