चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा क्रिकेट असोसिएशनतर्फे सत्कार

चिपळूण / प्रतिनिधी: चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी श्री. उमेश सकपाळ यांची निवड झाल्याबद्दल चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. शहराच्या विकासात क्रीडा क्षेत्राला भक्कम पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दशरथशेठ दाभोळकर, उपाध्यक्ष व युवानेते श्री. अनिरुद्ध निकम, सेक्रेटरी श्री. राजेश सुतार, ज्येष्ठ समालोचक श्री. सचिन कुलकर्णी, सदस्य पत्रकार श्री. योगेश बांडागळे, श्री. सुयोग चव्हाण, प्रशिक्षक श्री. उदय काणेकर, श्री. फैसल मेमन, श्री. संदेश गोरीवले तसेच श्री. प्रसादजी (भाऊ) देवरुखकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी नगर परिषद सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. तालुक्यातील क्रिकेट आणि युवकांच्या क्रीडा विकासासाठी असोसिएशन राबवत असलेल्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

संबंधित लेख