चिपळूण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी सौ. शीतल रानडे

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. युतीतील दोन्ही पक्षांकडून या पदासाठी अनेक नावे पुढे येत असून, भाजपकडून सौ. शीतल स्वानंद रानडे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची पहिली संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सौ. रानडे यांनी प्रभाग १४-अ मधून भाजपकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कन्येविरोधात जोरदार लढत दिली; मात्र त्या अल्प मतांनी पराभूत झाल्या होत्या. निवडणुकीत झालेला पराभव असूनही त्यांच्या कामाची दखल घेत आता त्यांची स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदाबाबत अनेक इच्छुकांना ‘शब्द’ देण्यात आल्याची चर्चा असून, त्यानुसार इच्छुकांना एक-एक वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख