चिंचघरी प्राथमिक शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

खेर्डी–चिंचघरी (सती) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा खेर्डी–चिंचघरी (सती) या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व उपस्थित शिक्षकवृंद यांच्या शुभहस्ते सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. बौद्धिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, फनी गेम्स तसेच संस्थांतर्गत विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांनी केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने परिश्रम करून भविष्यात उज्ज्वल यश संपादन करावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका विनया नटेअर्चना देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्यासह मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शीतल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे, विनोद उदेग, एकनाथ चाळके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख