गोवळकोट परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 66 views
चिपळूण : गोवळकोट पाणी उपसा केंद्रातील ट्रान्सफॉर्मर उडाल्यामुळे जॅकवेलमधील मोटार व पंपमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असल्याची माहिती चिपळूण नगरपरिषदेमार्फत देण्यात आली आहे.
या बिघाडाचा परिणाम गोवळकोट गाव, पेठमाप, मुरादपूर, गोवळकोट रोड व उक्ताड या भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी उद्या शुक्रवार दि. ०२ जानेवारी २०२६ पासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की, संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिरा होण्याची शक्यता असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच, सर्व नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती मा. मुख्याधिकारी, चिपळूण नगरपरिषद यांनी दिली आहे.
