गुहागर नगरपंचायतीत अमरदीप परचुरे यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती

गुहागर : नाट्य परिषद सदस्य श्री. अमरदीप परचुरे यांची गुहागर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गुहागर नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे नगरसेवक श्री. प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून श्री. संतोष सांगळे आणि शिवसेनेकडून श्री. अमरदीप परचुरे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा नगराध्यक्षा श्रीमती नीता मालक यांनी केली.

अमरदीप परचुरे यांच्या नियुक्तीमुळे नगरपंचायतीच्या कामकाजाला अनुभवाची व सांस्कृतिक क्षेत्राची जोड मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख