काँग्रेस गटनेतेपदी साजिद सरगुरोह यांची निवड
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 117 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष साजिद सरगुरोह यांची निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेत काँग्रेस पक्षाचे एकूण तीन नगरसेवक असून, पक्षाच्या वतीने गटनेतेपदाची जबाबदारी साजिद सरगुरोह यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
साजिद सरगुरोह हे अभ्यासू, सक्रिय आणि शहरातील विविध समस्या व प्रश्नांची सखोल जाण असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सामाजिक व नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
