देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन
- September 23, 2025
- 36 Views
रत्नागिरी / चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज चिपळूणमध्ये उद्योजक प्रकाश देशमुख यांचा मान्यवर सत्कार करण्यात आला. देशमुख यांनी आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार भारताबाहेर करत देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी, “उद्योजकांनी रोजगार निर्मिती, कौशल्यवर्धन आणि स्थानिकांना प्राधान्य देत उद्योग क्षेत्रात जिल्ह्याची ओळख देश-विदेशात निर्माण करावी. प्रकाश देशमुख यांचे कार्य प्रेरणादायी असून तरुण उद्योजकांसाठी ते आदर्श आहेत,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास खेड पंचायत समितीचे माजी सभापती अण्णा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, माजी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, अमेय चितळे व शिवसेना उपशहरप्रमुख कपिल शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश देशमुख यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील व्यवसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
