आरती फाऊंडेशन व कलामृत प्रतिष्ठानतर्फे मालघर येथे विविध कार्यक्रम संपन्न

मालघर : छत एक सेवा अनेक या संकल्पनेतर्गत पितृपक्षातील एकादशी निमित्त आरती सेवा फाऊंडेशन व कलामृत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत गुरुकूल हायस्कूल, राधाकृष्ण मंदिर, जिल्हा परिषद शाळा तसेच शेजारील निर्वाळ गावातील रावळगाव जि.प. शाळा, सामाजिक कार्यकर्ते श्री. शशिकांत चव्हाण यांचे निवासस्थान आदी ठिकाणी हरिनाम सत्संग, निरुपण व बालगोकुलम उपक्रम घेण्यात आले.

कलामृत प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. विराजभाऊ चिखले यांनी मुलांशी प्रश्नोत्तरातून संवाद साधत हसत-खेळत भारतीय सनातन संस्कृतीचे महत्व पटवून दिले. तर आरती फाऊंडेशनच्या संस्थापिका अनिताताई नारकर यांनी सामाजिक कार्याची ओळख करून दिली. यावेळी मुलांना बक्षिसे व खाऊवाटपही करण्यात आले.

संध्याकाळी एकादशी व द्वादशी निमित्त विठ्ठलाचे भजन तसेच निरुपण विराजभाऊ चिखले, लतिकाताई काडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, मुले तसेच फाऊंडेशनमधील वृद्ध व दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विराजभाऊ चिखले, अनिताताई नारकर, कलामृत प्रतिष्ठानचे रमेश डाडर, दत्ताराम लाडघरकर, भाग्यश्री तावडे, जान्हवी मोरे, सविता नाईक, रश्मी रसाळ, सारंगी नेवरेकर यांच्यासह आरती फाऊंडेशनचे अध्यक्ष आत्माराम नारकर, विद्या महाजन, विवेक म्हात्रे, शर्मिला महाकाळ, श्रावणी माणके, मानसी जाधव, सिद्धी कदम, मनाली घाडे, तेजस्विनी कांबळे, संघमित्रा सकपाळ, सुप्रिया सावंत व श्री. शशिकांत चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवेशितांच्या सुमधुर आभार गीताने या उपक्रमांची सांगता कर

ण्यात आली.

संबंधित लेख