आमदार भास्करराव जाधव यांचा उद्या कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम

चिपळूण, दि. १६ : शिवसेना नेते तथा भास्करराव जाधव यांनी मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात आमदार जाधव कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार असून, संघटनात्मक बळकटीसाठी पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. तसेच अलीकडील निवडणुकांमध्ये मतदारसंघातील पक्षाचे विजयी तसेच पराभूत उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम चिपळूण येथील बांदल स्कूल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख