आफिया चिकटेची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड; सावर्डेचा अभिमान
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 100 views
सावर्डे : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नुकत्याच झालेल्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमी, सावर्डेची गुणवंत खेळाडू आफिया चिकटे हिने उत्कृष्ट कामगिरी करत रत्नागिरी जिल्हा संघात स्थान मिळवले आहे. हा संघ लवकरच महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनमार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धा पुणे येथे पार पडणार आहेत.
आफिया चिकटे ही अत्यंत गुणवान, जिद्दी आणि होतकरू अशी क्रिकेटपटू असून ती गेली तीन वर्षे प्रशिक्षक श्री. शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रशिक्षण घेत आहे. तसेच ती सह्याद्री शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे.
आफियाच्या निवडीबद्दल गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीचे सर्वेसर्वा व विद्यमान आमदार श्री. शेखरजी निकम, अकॅडमीचे अध्यक्ष युवा नेतृत्व अनिरुद्धजी निकम, सह्याद्री शिक्षण संस्था, प्रशिक्षकवर्ग आणि पालकवर्ग यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
