आता फक्त काम बोलणार…!
- by Yogesh Bandagale
- December 31, 2025
- 148 views
रामोशी आळीतील मचूळ पाणीप्रश्नी निहार कोवळे यांची तत्काळ टँकरची व्यवस्था
चिपळूण : शहरातील रामोशी आळी परिसरात मचूळ पाणी येत असल्याची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निहारभाई कोवळे यांनी तातडीने दखल घेत नगराध्यक्ष श्री. उमेशजी सकपाळ यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निहार कोवळे हे सर्वसामान्यांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणारे नगरसेवक म्हणून ओळखले जात आहेत. “रात्री-अपरात्री निहारची खात्री” हे त्यांचे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. माहिती मिळताच विलंब न करता प्रशासनाशी समन्वय साधून नागरिकांच्या मूलभूत गरजेवर उपाययोजना करण्यात आली.
नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने तातडीची व्यवस्था उभी करत नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित केला. या वेळी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक निहार कोवळे व नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे आभार मानले.
कामातूनच विश्वास निर्माण होतो—या तत्त्वावर निहार कोवळे यांची वाटचाल सुरू असून, भविष्यातही नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सदैव तत्पर राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
