यंदाची शारदीय नवरात्र १० दिवसांची; दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन आगमन करणार

मुंबई : शारदीय नवरात्र उत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून १ ऑक्टोबर रोजी दुर्गा नवमीने संपन्न होईल. विशेष म्हणजे, यंदाची नवरात्र पारंपरिक ९ दिवसांची नसून १० दिवसांची असणार आहे. याआधी २०१६ मध्ये अशीच १० दिवसांची नवरात्र झाली होती. पुन्हा ही संधी तब्बल ९ वर्षांनी मिळत आहे.

? तृतीया/चतुर्थी तिथी दोन दिवसांची
भारत सरकारच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार, या वेळी तृतीया तिथी २४ आणि २५ सप्टेंबर रोजी येईल. मात्र काही पंचांगांनुसार चतुर्थी तिथी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी दोन दिवस राहील. त्यामुळे भक्तांना एक अतिरिक्त दिवस देवीची पूजा करण्याची संधी मिळणार आहे. नवरात्र संपल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल.

? माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार
यंदा नवरात्र रविवारपासून सुरू होत असल्याने माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आगमन करणार आहे. हत्ती हा समृद्धी, कल्याण आणि संपत्तीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे यंदाच्या नवरात्र उत्सवामुळे समाजाच्या सुख-समृद्धीत भर पडेल, अशी श्रद्धा आहे.

? नऊ दिवस, नऊ रूपे
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते –
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.

? पूजा कशी करावी?

  • सकाळी स्नान करून प्रथम गणेशपूजन करा.

  • देवी दुर्गेला पाण्याने व पंचामृताने स्नान घालून लाल वस्त्रे, दागिने, सुगंध, हार अर्पण करा.

  • धूप, दीप, लाल फुले, नारळ व मिठाई अर्पण करून आरती करा.

  • पूजेदरम्यान “दुं दुर्गायै नमः” हा मंत्र जपा.

  • विशेष मंत्र :
    “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्येत्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते।।
    ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

दुर्गा सप्तशतीचे पठण, देवीच्या कथा वाचन आणि गोशाळेत दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे.

संबंधित लेख