पाग-चिपळूणमध्ये श्री सुकाई देवी नवरात्रोत्सव
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 160 views
चिपळूण (प्रतिनिधी) : पाग येथील श्री सुकाई देवी नवरात्रोत्सव सन २०२५ या वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांच्या आयोजनासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. देवीच्या महाआरतीचा सोहळा दररोज सायंकाळी साडेसात वाजता पार पडणार असून कार्यक्रमामध्ये बदल करण्याचा अधिकार श्री सुकाई देवी देवस्थान कमिटीने राखून ठेवला आहे.
नवरात्रोत्सवाची सुरुवात सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घटस्थापनेने होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता हिंदू जनजागृती समितीचे प्रवचन नवरात्रोत्सव आणि शौर्य जागरण होणार असून रात्री दहा वाजता श्री देव हनुमान प्रासादिक भजन मंडळ पाग-चिपळूण यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
मंगळवार दि. २३ रोजी रात्री दहा वाजता श्री देव गोपाळकृष्ण भजन मंडळ, पाग-चिपळूण तर बुधवार दि. २४ रोजी दुपारी चार वाजता नवगणेश महिला भजन मंडळ पिंपळी खुर्द, ता. चिपळूण यांचे भजन सादर होणार आहे.
गुरुवार दि. २५ रोजी रात्री दहा वाजता श्री सुकाई देवी भजन मंडळ भुवड बंधू आणि सहकारी तर दुपारी चार वाजता श्री विश्वकर्मा महिला भजन मंडळ, चिपळूण यांचे भजन होणार आहे. त्याच दिवशी रात्री दहा वाजता श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, ओझरवाडी यांचा कार्यक्रम होईल.
शुक्रवार दि. २६ रोजी सायं. चार वाजता श्री जिव्हेश्वर महिला भजन मंडळ, पेठमाप-चिपळूण तर रात्री दहा वाजता श्री जय हनुमान भजन मंडळ, पेढे कुंभारवाडी सादरीकरण करणार आहेत.
शनिवार दि. २७ रोजी रात्री दहा वाजता “स्वराभिषेक” संगीत कार्यक्रमांतर्गत श्री. प्रकाश सकपाळ यांचा मराठी गीतांचा नजराणा रंगणार आहे.
रविवार दि. २८ रोजी सायं. चार वाजता श्री कालिकामाता महिला भजन मंडळ, पेठमाप-चिपळूण तसेच रात्री दहा वाजता श्री हनुमान सेवा भजनी मंडळ, मांडकी खुर्द यांचे भजन होणार आहे.
सोमवार दि. २९ रोजी सायं. पाच वाजता राष्ट्रसेवा समितीचे देवी स्तोत्र पठण होईल. मंगळवार दि. ३० रोजी सायं. चार वाजता श्रीराम प्रासादिक महिला भजन मंडळ, वाणीआळी, चिपळूण तर रात्री दहा वाजता श्री देव हनुमान महिला भजन मंडळ, पाग-चिपळूण तसेच श्री गुरुदेव दत्त प्रासादिक भजन मंडळ-पेढे, चिपळूण (श्री. पानकर बुवा) यांचे सादरीकरण होणार आहे.
बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री घटीदेव उत्थापन (उठविणे) होईल. दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी श्री दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशक्तीचे पाठ (श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, चिपळूण) आयोजित करण्यात आले असून सायं. पाच वाजता स्वररत्न महिला भजन मंडळ, पाग-चिपळूण तर रात्री दहा वाजता श्री गजानन स्मृती भजन मंडळ, पाग-चिपळूण (चव्हाण बंधू व सहकारी) सादरीकरण करणार आहेत.
गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी दसरा (विजयादशमी) निमित्त सोने लुटणे हा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी सायं. साडेचार वाजता “स्वरांजली” मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कराओके कार्यक्रम (जावकर बंधू व सहकारी) रंगणार असून रात्री नऊ वाजता पाग ग्रामस्थ महिलांचा फुगडी (जाकडी) व टिपरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या नवरात्रोत्सवात धार्मिक भक्तिभावासह सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी भाविकांना लाभणार असून पाग परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे.
