महाराष्ट्राचा अर्थसंकल्प: विकास, शाश्वतता आणि सर्वसमावेशकतेवर भर
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 73 views
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली. हा अर्थसंकल्प चार प्रमुख स्तंभांवर आधारित आहे – प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन. या प्रत्येक स्तंभात चार उपक्षेत्रांचा समावेश असून, एकूण 16 उपक्षेत्रांवर आधारित हा व्यापक अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.
शेती
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी.
-
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान.
-
जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत शेतकऱ्यांना 15,492 कोटी रुपयांचे वितरण.
-
10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करणार.
-
एआय आधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर – महाविस्तार एआय, वसुधा व्हॉईस टेलिफोनी, महाराष्ट्र अॅग्रीकल्चर डेटा एक्सचेंज इत्यादी उपक्रम.
-
चार कृषी विद्यापीठांत AI Innovation & Incubator Center स्थापन.
-
जानेवारी 2026 पर्यंत 1.31 कोटी Farmers ID तयार.
-
नवीन प्राकृतिक शेती अभियान – 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार.
-
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना – पशुधनात स्वयंपूर्णता आणि रोजगारनिर्मिती.
-
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना – दरवर्षी 1240 कोटी, 20,594 मासेमारांना लाभ.
-
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच; यंदा 20,000 कोटींची तरतूद.
-
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 – 16,000 मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट.
-
मागेल त्याला सौर कृषीपंप – आतापर्यंत 6.63 लाख पंप वितरित; महाराष्ट्र देशात क्रमांक 1.
सिंचन व पाणी
-
ग्रामीण भागात दरडोई 55 लिटर आणि शहरी भागात 135 लिटर पाणी उपलब्धतेचे लक्ष्य.
-
नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र – 71.20 कोटी.
-
कोल्हापूर-सांगली पूरनियंत्रणासाठी 2240 कोटींचा प्रकल्प.
-
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प – 94,968 कोटी.
-
दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प – 13,497 कोटी.
-
नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प – 7465 कोटी.
-
जलयुक्त शिवार व जलसंधारण योजनांवर भर.
महिला सक्षमीकरण
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठी मोठी तरतूद.
-
अंगणवाडी सेविकांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण.
-
एकल महिला धोरण लवकरच.
-
राज्यात 27 लाख लखपती दीदी, पुढील वर्षात आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवणार.
-
महिला बचतगटांसाठी 13 जिल्ह्यांत उमेद मॉल.
युवा, शिक्षण व क्रीडा
-
नवी मुंबईत एज्युसिटी – 6 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे.
-
मुख्यमंत्री विज्ञान वारी – विद्यार्थ्यांना ISRO व NASA भेटीची संधी.
-
महिमा संस्था – परदेशी नोकऱ्यांसाठी कौशल्य व भाषा प्रशिक्षण.
-
पुढील 5 वर्षांत 1.25 लाख उद्योजक घडवणार.
-
50 हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन.
-
12 खेळांसाठी हायपरफॉर्मन्स सेंटर.
वारसा व संस्कृती
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे संवर्धन.
-
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक.
-
पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक.
-
छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर.
-
2026-27 हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार.
आरोग्य
-
नागपूर येथे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था.
-
ग्रामीण भागासाठी 4500 कोटींची आरोग्य योजना.
-
महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान.
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची संख्या वाढवली.
अर्थव्यवस्था
-
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सकडे वाटचाल.
-
2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट.
-
2026-27 अर्थसंकल्पाची एकूण तरतूद 7,69,467 कोटी रुपये.
पायाभूत सुविधा
-
तिसरी मुंबई – अटलसेतू परिसरात ग्रीनफिल्ड शहर.
-
वाढवण बंदर – 12 लाख रोजगार निर्मिती.
-
मुंबई मेट्रो 11 आणि मेट्रो 8 प्रकल्प.
-
पुणे मेट्रो टप्पा 2 मंजूर.
-
पुणे-लोणावळा तिसरी व चौथी रेल्वेमार्गिका.
-
राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 किमीपर्यंत वाढवणार.
उद्योग
-
इन्व्हेस्ट महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म.
-
18 अतिविशाल औद्योगिक केंद्र.
-
50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट.
-
गडचिरोली स्टील हब – 2.61 लाख कोटी गुंतवणूक.
हरित महाराष्ट्र
-
राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड.
-
2029 पर्यंत 50% हरित ऊर्जा आणि 2035 पर्यंत 65% लक्ष्य.
-
रुफटॉप सोलार योजना – 5 लाख कुटुंबांना लाभ.
-
जुनी वाहने बदलल्यास मोटार करात 15% सूट.
सुशासन
-
75 हजार नवीन पदभरती.
-
आपले सरकार 2.0, महाडीबीटी 2.0 पोर्टल.
-
100% ई-ऑफिस व कागदविरहित प्रशासन.
-
नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर.
सुरक्षा
-
स्मार्ट पोलिसिंग व 100% डिजिटल पोलिस व्यवस्था.
-
पोलिसांसाठी बॉडी वॉर्न कॅमेरे.
-
नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था.
-
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 4 नवीन तुकड्या.
