भारत-रशिया मैत्री ध्रुवताऱ्यासारखी अढळ – मोदी
- by Yogesh Bandagale
- December 05, 2025
- 29 views
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि रशियामधील मैत्री ‘ध्रुव ताऱ्यासारखी अढळ’ असल्याचे सांगितले. गेल्या आठ दशकांत जगाने अनेक संकटे, युद्धस्थिती आणि बदल पाहिले असले तरी भारत-रशिया नात्यात कधीच ढळढळीतपणा आला नाही, असे ते म्हणाले. दोन्ही देशांच्या संबंधांनी प्रत्येक परीक्षेतून यशस्वीपणे वाटचाल केली असून २०३० पर्यंत आर्थिक सहकार्यासाठी संयुक्त धोरण आखण्यात आल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला तेलपुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील, असे आश्वासन दिले. पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर असून आज सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचे २१ तोफांच्या मानवंदनेने स्वागत करण्यात आले. त्यानंतर गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतीस अभिवादन केले.
