सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा: मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी
- by Yogesh Bandagale
- January 29, 2026
- 151 views
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची जाहीर मागणी केली आहे. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्याच दिवशी हे वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, या भेटीमागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.
अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर नेतृत्वाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ते उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बारामतीचे आमदार आणि पक्षाचे प्रमुख नेते होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सरकार आणि पक्षातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रिक्त झाल्या आहेत.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे प्रमुखपणे उपस्थित होते. संपूर्ण विधीदरम्यान तेच पुढे राहून मान्यवरांच्या भेटी घेत होते. यामुळे अजित पवार यांच्या राजकीय वारसाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
