यूपीएससी निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवार यशस्वी
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 32 views
नवी दिल्ली : Union Public Service Commission (केंद्रीय लोकसेवा आयोग) मार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देशभरातून एकूण ९५८ उमेदवार या परीक्षेत यशस्वी ठरले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे.
जाहीर झालेल्या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. त्यामध्ये ऋषिकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७) आणि दीक्षा पाटकर (८८) यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार
ऋषिकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१).
यंदाच्या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
