ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने मनसेत नाराजीची चर्चा
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 100 views
मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मुंबईतही लवकरच महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची असणार आहे. कारण या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता हिसकावण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तर भाजप आणि महायुतीच्या चॅलेंजला सामोरं जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील मदत लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली जात आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मग महाविकास आघाडीचं काय होणार? असादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ते मान्य राहणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कदाचित ठाकरे गटाकडून मनसेला मविआत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्नदेखील केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे याचबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं. पण त्यांच्या या वक्तव्यावरुन मनसे नाराजी झाल्याची माहिती समोर येत आहे.
