गिलच्या राज्यात कसोटीला पुन्हा 'शुभ'दिवस; विंडीजचा सुपडा साफ करत मालिका 2-0 ने खिशात

 

दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिला सामना भारताने 140 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला ज्यात भारताने सहज विजय नोंदवला आणि मालिकाही 2-0 ने जिंकली. भारताच्या युवा कसोटी संघाने दिल्ली कसोटी 7 विकेटनी जिंकली. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताने पहिली कसोटी जिंकली.

भारताने दिल्ली कसोटीचे नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात 518 धावा केल्या. भारताच्या 518 धावांच्या प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त 248 धावांवर संपला. फॉलोऑनचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार कामगिरी केली, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने शतक झळकावले. दरम्यान, वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होपनेही शतक झळकावले. परिणामी, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर संपला आणि त्यांना 120 धावांची आघाडी मिळाली. याचा अर्थ भारताला आता जिंकण्यासाठी फक्त 121 धावांची आवश्यकता होती.

संबंधित लेख