श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आनंदराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक

चिपळूण (२७ सप्टेंबर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी प्रकारात श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी विरुद्ध अटीतटीची झुंज देत चिपळूणच्या विद्यार्थिनींनी विजय संपादन केला. कु. गौरी कांबळी, कु. खुशी जोगले, कु. समिक्षा पवार, कु. आर्या नांदलस्कर, कु. समृध्दी बुरटे, कु. नीरजा लवेकर, कु. सानवी वाघे, कु. सानिया पठाण, कु. समृध्दी महाडीक, कु. आर्या चव्हाण, कु. रिया उदेग, कु. सुजाता पवार या खेळाडूंनी सामन्यात उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत, चिकाटी, चपळाई आणि संघभावना दाखवली.

या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थिनींना प्राध्यापक रुपेश भालेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघाला यशाच्या शिखरावर पोहोचता आले.

या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मल्लेश लकेश्री सर, कार्यवाह प्रशांत देवळेकर सर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड सर, रजिस्ट्रार अजित खेडेकर सर, पी. आर. ओ. योगेश चोगले सर, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख