रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६ ची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गृहिणी व पाककला प्रेमींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नव्याने सुरू होत असलेल्या “कोकम करी” थीम रेस्टॉरंटकडून “रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६”चे आयोजन करण्यात आले आहे. पारंपारिक व लुप्त पावत चाललेल्या अस्सल कोकणी पदार्थांना व्यासपीठ मिळावे आणि स्थानिक चवींना व्यावसायिक संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादित असून शाकाहारी, मस्त्याहारी व मांसाहारी अशा तीन गटांत स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये २१,०००/- असून एकूण बक्षिसांची रक्कम रुपये ५१,०००/- इतकी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२६ दुपारी १२.०० वाजेपर्यंत असून स्पर्धा बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एलजी शोरूम शेजारी, जे. के. फाइल्स, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेद्वारे सहभागींच्या हातच्या चवीला व्यावसायिक व्यासपीठ मिळणार असून छंदाला करिअरची दिशा देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी आयोजकांनी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली असून अधिक माहितीसाठी 8010803302, 9370550302 किंवा 9822290859 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

नव्याने सुरू होणाऱ्या कोकम करी रेस्टॉरंट येथे महिला आचारी (शेफ), सर्व्हिस स्टाफ व हाऊस किपिंग स्टाफ यांना काम करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून कोकम करी रेस्टॉरंट, हर्षा टेरेस गार्डन रेस्टॉरंट, हॉटेल सी फॅन्स (मांडवी), अंबर हॉल आणि सुरुची केटरर्स, रत्नागिरी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आयोजकांनी जिल्ह्यातील पाककला प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कोकणच्या अस्सल चवीचा वारसा जपावा, असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख