नॅब आय हॉस्पीटल चिपळूणला पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांची भेट
- by Yogesh Bandagale
- December 23, 2025
- 171 views
चिपळूण : नॅब आय हॉस्पीटल चिपळूणला पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी भेट दिली.
भेटीप्रसंगी डॉ. तात्याराव लहाने यांना अध्यक्ष श्री. निलेश भुरण यांनी माहिती दिली तसेच आतापर्यंतच्या झालेल्या शस्त्रकिया ७८००० माहिती देण्यात आली. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नवीन उपक्रमाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी त्यांना शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री. भरत नांदगावकर, संचालक ॲड. विवेक रेळेकर, प्रकाश पाथरे, सौ. खर्चे, सौ. राधिका पाथरे,ॲड. थरवळ, डॉ. अमित खेडेकर डॉ. ऋचा भिडे, डॉ.जान्हवी देसाई डॉ पुष्कराज नारखेडे व सहकारी उपस्थित होते.
