जय भीम विकास मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
- by Yogesh Bandagale
- February 01, 2026
- 118 views
चिपळूण | प्रतिनिधी: शहरातील पेठमाप येथील जय भीम विकास मंडळ, पेठमाप बौद्धवाडी यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
माजी नगरसेविका स्वाती दांडेकर आणि नगरसेवक प्रमोद बुरटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तसेच नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते पीत कापून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाली.
या वेळी स्वीकृत नगरसेवक विकी लवेकर, उद्योजक निकेश हरवंदे, निवृत्त तहसीलदार उल्हास कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, नितीन कदम, अमित कदम, अभिजीत कदम, साहिल कदम, तसेच मंडळाच्या सदस्यांनी केले.
ही क्रिकेट स्पर्धा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आली असून, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, ही अत्यंत अवघड गोष्ट असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या भाषणात नमूद केले. ही स्पर्धा सलग २५ वर्षे सुरू राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी या वेळी दिल्या. क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडूंमध्ये या स्पर्धेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
