आमदार शेखरजी निकम यांच्या शिफारसीने मानसी करंबेळे यांची तालुका समिती सदस्यपदी नियुक्ती
- by Yogesh Bandagale
- October 07, 2025
- 137 views
देवरुख, दि. ७ ऑक्टोबर: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम यांच्या शिफारसीनुसार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तालुका समितीच्या सदस्यपदी कासारकोळवण गावच्या सरपंच आणि राष्ट्रवादी महिला तालुकाअध्यक्ष सौ. मानसी महेंद्र करंबेळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर सौ. करंबेळे यांनी सांगितले की, “तालुक्यातील निराधार व्यक्तींच्या न्याय हक्कासाठी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करतीन.”
सौ. मानसी करंबेळे यांची सदस्यपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, तालुका संघटक बाळू शेठ ढवळे, युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, देवरुख शहर अध्यक्ष हनिफ शेठ हरचिरकर, महिला शहर अध्यक्ष अक्षदा सावंत, गायत्री बने, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, युवक देवरुख शहर अध्यक्ष बंडू जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
