सह्याद्री प्राथमिक शाळा सावर्डे ठरली ‘चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री’
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 26 views
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक क्रीडा संग्रामात दणदणीत यश
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेअंतर्गत प्राथमिक शाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सह्याद्री क्रीडा संग्राम’ स्पर्धेत प्राथमिक शाळा सावर्डे हिने उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री’ हा मान पटकावला.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेत आराध्या मंगेश भुवड हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत दीपेंद्र इंद्रबहादूर मौनी याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच, मुलांच्या व मुलींच्या रिले स्पर्धेत सावर्डे शाळेचा संघ विजयी ठरला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सह्याद्री स्पर्धा परीक्षा अध्यक्ष अनिरुद्ध निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडीक, उदयराज कळंबे, अमर भाट, अरविंद सकपाळ, महेंद्र साळुंके, शकील मोडक, समीक्षा पिटले, स्वाती महाडीक, मीरा जोशी व मनाली पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धांसाठी अनिल रेडेकर, रसिका सुर्वे, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, सेजल साळवी, प्रणित राजेशिर्के, मनीषा शिंदे, श्रुती कांबळे, योगिता मोहिते, अंकिता कुंभार आणि सतीश वारे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, तसेच पूजा निकम, प्रशांत निकम, शांताराम खानविलकर, मारुती घाग, मानसिंग महाडीक आणि आकांक्षा पवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
