देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन
- September 23, 2025
- 53 Views
चिपळूण : ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो, कारण याच दिवशी १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते, आणि या दिवशी त्यांचे स्मरण करून पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला जातो.
मंगळवारी शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पत्रकार संघ चिपळूण व लोटिस्मा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला आणि बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, संचालक धीरज वाटेकर, प्रा. गोणबरे, तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष मुझफ्फर खान आणि सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उपस्थितांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील कार्याचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचा पाठपुरावा करण्याचे महत्त्व सांगितले, तसेच पत्रकारितेत सत्यनिष्ठा आणि समाजसेवा टिकवण्याचे आवाहन केले.
