नवरात्रोत्सवात आमदार शेखर निकम यांची मुंबईतील नवरात्र मंडळांना भेट
- by Yogesh Bandagale
- September 24, 2025
- 38 views
मुंबई (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मुंबईतील विविध नवरात्र मंडळांना सदिच्छा भेट देत देवीचे दर्शन घेतले.
त्यांनी प्रेमनगर स्पोर्ट क्लब (चूनाभट्टी), स्वामी समर्थ नवरात्रोत्सव मंडळ (चेंबूर) आणि वैष्णव ग्रुप (चेंबूर) येथे उपस्थित राहून सर्वांसाठी सुख, शांती आणि आरोग्यदायी जीवनाची प्रार्थना केली.
या भेटीदरम्यान, मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांशी आमदार निकम यांचा आत्मीय संवाद साधला. त्यांनी राजकीय नात्यापलीकडे जाऊन प्रत्येकाशी आपुलकीने विचारपूस करत आप्तस्वकीयासारखे नाते जपले. गावातील विकासकामे, मुंबईतील परिस्थिती व कोकणवासीयांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करून कोकणाशी असलेली नाळ अधिक बळकट केली.
यावेळी जिगणेश पाटील, चेतन शितप, संदेश चव्हाण, साहिल लांबाडे, प्रविण चव्हाण, अजित पवार, निखिल आग्रे, जावेद खलपे, अमोल साळवी, लोकेश शेट्टी, चिराग रामदिया, नन्मय सावंत, करण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील कोकणवासीयांमध्ये उत्साह व आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले असून, आमदार शेखर निकम यांच्याविषयी कोकणवासीयांची आत्मीयता आणि विश्वास यामुळे त्यांचे कार्य अधिक परिणामकारक ठरले, असे दिसून आले.
