नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा उद्या पदग्रहण सोहळा
- by Yogesh Bandagale
- December 28, 2025
- 221 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या शिवसेना–भाजप–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. उमेश संगीता धोंडीराम सकपाळ यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन उद्या सोमवारी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्याला शहरासह संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमास राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. विशाल कमल श्रीरंग भोसले भूषविणार आहेत.
या वेळी माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते श्री. प्रशांत यादव, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. राहुल पंडित व श्री. शशिकांत चव्हाण, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. रश्मी गोखले, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संदेश आयरे, भाजप तालुकाध्यक्ष श्री. विनोद भुरण, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. रुपेश घाग, रिपाइं शहर अध्यक्ष श्री. मंगेश जाधव, रिपाइं तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत मोहिते, रिपाइं तालुका सचिव श्री. उमेश सकपाळ, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. महेश सकपाळ व तालुकाप्रमुख श्री. चंद्रसेन मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पदग्रहणानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपली भूमिका मांडणार असून, महायुतीच्या माध्यमातून समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करणार आहेत.
दरम्यान, दुपारी १२.०० वाजता
बहादुरशेख नाका येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून रॅलीला सुरुवात होईल. सदर रॅली आंबेडकर पुतळा परिसरातून चिपळूण नगर परिषद कार्यालयाकडे प्रस्थान करेल.
हा पदग्रहण सोहळा शिवसेना–भाजप–रिपाइं महायुती, चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
