देवरुख ग्रामीण रुग्णालयात आमदार निकम यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उदघाटन

देवरुख : ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हिरकणी कक्ष देवरुख ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आला आहे. या कक्षाचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतिनंतरच्या काळातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या सुविधेमुळे महिलांना वेळेत सुरक्षित वैद्यकीय उपचार मिळणार असून ग्रामीण रुग्णालयाच्या सेवा अधिक प्रभावी होतील, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला.

उद्घाटनावेळी आमदार निकम यांनी रुग्णालयातील कर्मचारी वर्गाशी संवाद साधला, रुग्णांची विचारपूस केली तसेच रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. “गावातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा आपला हक्क आहे. हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिलांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळेल,” असे मत त्यांनी यावेळी मांडले.

या प्रसंगी डॉक्टर माने, हनीफशेठ हरचिरकर, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळककर, नितिन भोसले यांच्यासह संपूर्ण हॉस्पिटल कर्मचारी वृंद उपस्थित

होते.

संबंधित लेख