चिपळूणमध्ये उद्या अजित पवार यांची सर्वपक्षीय शोकसभा

चिपळूण  : दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनासाठी अत्यंत दुःखद अशी घटना घडली. राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या उपमुख्यामंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

या दु:खद घटनेप्रति शोक व्यक्त करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, वकील, डॉक्टर, विविध मंडळे, ट्रस्ट, आस्थापना तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोकसभा शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आली असून या सभेस तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या शोकसभेच्या आयोजनासाठी शेखर गोविंदराव निकम (चिपळूण) यांनी पुढाकार घेतला असून सर्वपक्षीय ऐक्याचे प्रतीक म्हणून ही सभा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संबंधित लेख