चिपळुणात उद्या साने गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या साने गुरुजी उद्यान येथे थोर समाजसुधारक, साहित्यिक व शिक्षक साने गुरुजी यांच्या १२५व्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता संपन्न होणार आहे.

या अनावरण सोहळ्यास राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष उमेश सकपाळ भूषविणार आहेत.

या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत यांची उपस्थिती अपेक्षित आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बोराटे, जिल्हाधिकारी मनूज जिंदल यांच्यासह चिपळूण नगर पालिकेतील सर्व नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.

साने गुरुजींच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख