गुहागरमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

गुहागर : शहरातील भाजप, शिवसेना आणि आर.पी.आय. मधील अनेक युवक तसेच महिला भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी भाजपच्या माजी महिला शहराध्यक्ष नेहा वराडकर, आर.पी.आय.च्या शीतल कदम, युवा सेनेचे सिद्धार्थ वराडकर आणि केदार वराडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्यांमध्ये अनिकेत वराडकर, स्वरूप वराडकर, सर्वेश वराडकर, ओंकार वराडकर, अथर्व वराडकर आणि आर्यन वराडकर यांचा समावेश आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, पक्षाचे सेक्रेटरी संतोष जोशी, काँग्रेसचे गुहागर प्रमुख पदाधिकारी श्रीधर बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ, महिला तालुकाध्यक्ष शलाका काष्टे, वृषाली ठाकरे आणि सायली आरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित लेख