करंबेळेतर्फे देवळे गोताडवाडी येथे १५ लाखांच्या सार्वजनिक सभागृहाचे भूमीपूजन
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 53 views
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथील गोताडवाडीमध्ये सार्वजनिक सभागृहाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. चिपळूण–संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपसरपंच कृष्णा काबदुले यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे.
या सार्वजनिक सभागृहाच्या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, शनिवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी वाडीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. या प्रसंगी मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमास उपसरपंच कृष्णा काबदुले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विभागीय नेते व माजी उपसरपंच प्रदीप कांबळे, वांझोळे हायस्कूलचे चेअरमन अनिल पंदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. मानसी करंबेळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गोताड, दिलीप गोताड, शांताराम तांदळे, महादेव गोताड, महेंद्र करंबेळे, कासार कोळवण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामू पंदेरे, शांताराम शेडगे, केदारलिंग रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, दत्ता चव्हाण, शांताराम झोरे, तुकाराम मिरगल, विजय खंडागळे, मंगेश काबदुले, सुनील गोताड, अनिल मिरगल, संतोष झोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या भागात आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसरपंच कृष्णा काबदुले यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मार्गी लागत असून, सार्वजनिक सभागृहामुळे गोताडवाडी परिसरातील ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
