आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 124 views
पेढे, परशुराम (ता. चिपळूण) : दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सरस्वती पूजन करून केली गेली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय मुख्याध्यापक श्री. माळी सर व पर्यवेक्षिका सौ. माळी मॅडम उपस्थित होते. तसेच सौ. कुले मॅडम यांनी वाचनाचे महत्त्व आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य व योगदान ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री. माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने घेतला, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि जिज्ञासा वाढल्याचे दिसून आले.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीसोबत वाचनासाठी प्रोत्साहन मिळाले आणि त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख पटली.
