प्रत्येक मजल्यावर फक्त एकच फ्लॅट!
- by Yogesh Bandagale
- September 30, 2025
- 209 views
योगेश बांडागळे
चिपळूण : चिपळूण शहरातील गगनरेषा बदलण्याच्या मार्गावर असून, विंध्यवासिनी रोडवरील रावतळे येथे ‘उर्वी स्कायलाईट’ ही एक लक्झरी निवासी इमारत उभारली जात आहे. गुहागर बायपास रोडवरील आकृती हाइट्ससारख्या वेगळ्या संकल्पनेच्या यशस्वी प्रकल्पानंतर ओंकार सुचय रेडीज या तरुण आणि उच्चशिक्षित व्यावसायिकाने ‘उर्वी इस्टेट्स’च्या माध्यमातून या नव्या प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे.
चिपळूण शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे आणि त्या बदलाचा एक भाग ठरणार आहे, उर्वी स्कायलाईट ही एक आगळीवेगळी लक्झरी इमारत. गुहागर बायपासवरील आकृती हाइट्सच्या यशानंतर बांधकाम क्षेत्रात दमदार पाऊल टाकलेले ओंकार रेडीज आता विंध्यवासिनी रोड, रावतळे येथे उर्वी इस्टेट्सच्या माध्यमातून या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची उभारणी करत आहेत.
या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मजल्यावर केवळ एकच फ्लॅट असणार आहे. चिपळूणमधील ही पहिलीच ‘वन फ्लॅट पर फ्लोअर’ अशी लक्झरी इमारत ठरणार आहे. एका फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे १७०५ चौरस फूट असून तीन शयनकक्ष, तीन बाथरूम्स, प्रशस्त हॉल, स्वतंत्र डायनिंग रूम, ड्राय बाल्कनीसह स्वयंपाकघर, खाजगी प्रवेश लॉबी, गार्डन बेड्स अशा सर्व सोयीसुविधांनी तो सुसज्ज असणार आहे.
या प्रकल्पात निश्चित पार्किंग, समारंभ व सणांसाठी मोठे टेरेस, सीसीटीव्ही निगराणी, इंटरकॉम कनेक्टिव्हिटी, बोरवेलद्वारे पाण्याचा पुरवठा, वॉचमन व ड्रायव्हरसाठी स्वतंत्र शौचालय, शिक्षण, काम आणि मनोरंजनासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, सर्व खोल्यांमध्ये टीव्ही पॉइंट्स, तसेच आठ व्यक्ती क्षमतेची बॅटरी बॅकअपसह हाय स्पीड ऑटोमॅटिक लिफ्ट या सुविधा देण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाचे आर्किटेक्ट नागसेन कांबळे आहेत. आरसीसी कन्सल्टंट मनोज जोशी, कायदेशीर सल्लागार विक्रांत वाडकर, तर इंटिरिअर व वास्तुशास्त्र सल्लागार पूजा डिंगणकर आहेत. या प्रकल्पामागे चिपळूणमधील तरुण, लंडनहून एमबीए केलेले, क्रिडाईचे सदस्य असलेले आणि बांधकाम व्यवसायात यशस्वी ठरलेले ओंकार रेडीज यांचा दूरदृष्टीचा विचार आहे.
‘उर्वी स्कायलाईट’ प्रकल्पामुळे चिपळूण शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची लक्झरी निवासी सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक बांधकाम व्यवसायाला एक नवा आयाम मिळणार आहे.
