एका दिवसात ३ भारतीयांचे शतक; राहुल, जडेजा आणि जुरेलचे अनोखे सेलिब्रेशन
- by Yogesh Bandagale
- October 03, 2025
- 90 views
अहमदाबाद : भारत-वेस्ट इंडिज कसोटीत शुक्रवारी तीन भारतीय फलंदाजांनी शतके झळकावून विक्रम नोंदवला. के. एल. राहुल, रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल यांनी प्रत्येकी शतक ठोकले. विशेष म्हणजे तिघांनीही आपले शतक वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले.
राहुलने आपले ११ वे कसोटी शतक पूर्ण केल्यानंतर हेल्मेटवरील तिरंगा चुंबन घेतले आणि शिट्टी वाजवून सेलिब्रेशन केले. सोशल मीडियावर चाहते हे सेलिब्रेशन राहुलने मुलगी इवाराला समर्पित केले असल्याचे म्हणत आहेत.
जडेजाने १६८ चेंडूत शतक पूर्ण केले आणि त्याच्या खास शैलीत तलवार फिरवून "तलवार सेलिब्रेशन" केले. तर कसोटीतील पहिलेच शतक झळकावणाऱ्या ध्रुव जुरेलने आपल्या वडिलांना (सेवानिवृत्त सैन्य हवालदार नेम चंद) समर्पित करत आर्मी सॅल्यूट केला. त्याने बॅट रायफलसारखी धरून सैनिकी सलाम केला.
खेळ संपल्यावर भारताने ५ विकेट्स गमावून ४४८ धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजवर २८६ धावांची आघाडी घेतली होती. कर्णधार शुभमन गिलनेही कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले.
