नायशीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
- by Yogesh Bandagale
- November 01, 2025
- 159 views
चिपळूण : तालुक्यातील नायशी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तालुका उपतालुकाप्रमुख किशोर घाग, सरपंच ऋतिका जाधव आणि उपसरपंच संदीप घाग यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चिपळूण शहरातील ‘अतिथी’ हॉटेलच्या सभागृहामध्ये चिपळूण शहर व तालुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीदरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुरक्षा घाग, काशीराम जाधव, शाखाप्रमुख धर्मेंद्र लाड, माजी शाखाप्रमुख महेंद्र घाग, नरेंद्र लाड, रवींद्र जाधव, जीवक जाधव, संतोष कदम, प्रदीप गमरे, संजय गमरे, अमित कदम, रुपेश जाधव, राजेश जाधव, संतोष जाधव, गोविंद जाधव, मनोज घाग, अरविंद घाग, दत्ताराम घाग, संतोष घाग, निकिता घाग, महेश धामणस्कर, दीपक धामणस्कर, राकेश धामणस्कर, विश्वनाथ धामणस्कर, श्रीराम धामणस्कर, रामचंद्र खोपे, फर्मान काझी, मजीद फणसेकर, माजी सरपंच समीक्षा घाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमास माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, रश्मी गोखले, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अण्णा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, माजी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, सुयोग्य चव्हाण आणि शिवसेना उपशहरप्रमुख कपिल शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे नायशी परिसरातील शिवसेना संघटनास बळ मिळणार असल्याचे नेतृत्वाकडून सांगण्यात आले.
